Kavita Mazhi

Friday, January 20, 2017

व्यथा नवऱ्याची….

दिवस रात्र आम्ही थकत नाही
बायकोची सेवा करण्याशिवायगत्यंतर नाही

घर दारातली काम मी रोज करतो
तरी आम्हीकुठे कमी पडतो

कितीही मनासारखं वागलो तरी
यांचं पोट भरत नाही

पोरं बाळांना सांभाळता सांभाळता होते आमची आबाळ
पोर म्हणतात तरी आई तूच महान

घराची साफ सफाई आमच्या शिवाय नाही
बाजाराची यादी दुकानात जात नाही

दळण दळायला लागतं दोन चाकी गाडी
भाजी फळ आमच्या माथी

घरात आमचा आवाज पार निघत नाही
बाहेरच्यांना मग आम्ही सोडत नाही

थकून भागुन आफिसात जातो
मग झोप डोळे उघडून देत नाही

जांभळ्या देऊन लागते पुरी वाट
लोक म्हणतात झोपला नाही का रे काल

गुपचूप बसून फक्त आम्ही हसतो
बोलता बोलता वेळ मारून नेतो

कोणाला सांगायची व्यथा जीवाची
कारण आता बायकोची सेवा करायची
Savita BK