Not all wounds are so obvious;
walk gently in the lives of others.
जीवन अवघड ही नाही आणि सोपं ही नाही. प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार हे नित्याचेच, पुढे वाटचाल करत राहणं हे मात्र खरं. पण चालत असताना खूप काही गोष्टी सोडाव्या लागतात तर नवीन फण्डे अवगत करावे लागतात. त्या परिस्थितीला सामोरे जातांना आयुष्यात येणाऱ्या माणसांचा फार मोलाचा वाटा असतो. बिकट परिस्थितीतून जातांना सहाय्य करणारी आणि खोचट बोलणारी, हसणारी, आणि मज्जा बघणारे ही सगळीच लक्षात राहतात अगदी शेवट पर्यंत.
काही दुःख / जख्मा इतक्या deep असतात, काळीज कापणाऱ्या त्याचा अंदाज लावू शकत नाही. दुःख छोटं मोठ हे प्रत्येकावर अवलंबून असत, त्याचा impact माणसा माणसापरी वेगवेगळा असतो. काही माणसं फारच हळवी, भावनाप्रधान, असतात तर काही निर्भीड, निडर तर सामर्थ्यवान असतात.
काही अबोल वाटणाऱ्या व्यक्ती मनात वादळ घेऊन वावरत असतात त्याला हे ही एक कारण असावं. व्यक्तीपरी वागण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. मागचा पुढचा विचार न करता जेव्हा कळत नकळत आपण एखाद्यावर हसतो, जोक करतो, त्या व्यक्तीवर होणाऱ्या परिणामाची पर्वा न करता. असं बेपर्वा वागणं किती घातक ठरू शकत याचा विचार आपण करत नाही.
जीवनाची समीकरण वयानुसार अनुभवानुसार परखड होत जातात. ही परिपक्वता काहींमध्ये लवकर येते तर काहींना वेळ लागतो. दुसऱ्याच्या सांगण्यावरून प्रभावी होतो आणि पटकन पुढच्याला judge करून मोकळे होतो. पण हे लक्षात घेत नाही प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. प्रत्येकाच्या विचारांवर प्रभाव पडणाऱ्या गोष्टी म्हणजे संस्कार, मित्र मैत्रीण, घर ऑफिस मधील वातावरण, नातेवाईक, आणि समाज ह्या फार मॅटर करतात.
म्हणूनच दुसऱ्यांशी बोलतांना, वागताना आणि सामाज्यात वावरताना अतिशय काळजीपूर्वक वागायला पाहिजे. स्वतःच्या भावना दुःखू नये असं आपल्याला वाटत मग दुसऱ्यांच्या भावनांशी खेळायचा अधिकार आपल्या हातात घेऊ नये. शब्द हे शस्र आहे त्याचा वापर जपून करायचा असतो. कुणाला घायाळ करण्याचा अधिकार आपल्याला नाही
थोडं बारकाईने निरीक्षण केलं तर ह्या गोष्टींची उत्तर तुम्हाला दिसतील, मिळतील.
Wowwww! What a quote...
काय सुंदर quote आहे. काही quote अक्षरशः touch करून जातात मनाला आणि कुठे तरी मनात घुटमळत राहतात, उठत बसता तेच तुमच्या background मध्ये slogan सारखे चालत राहतात. असं जेव्हा होत त्या मागचं काय बरं कारण असावं ?
काय सुंदर quote आहे. काही quote अक्षरशः touch करून जातात मनाला आणि कुठे तरी मनात घुटमळत राहतात, उठत बसता तेच तुमच्या background मध्ये slogan सारखे चालत राहतात. असं जेव्हा होत त्या मागचं काय बरं कारण असावं ?
जीवन अवघड ही नाही आणि सोपं ही नाही. प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार हे नित्याचेच, पुढे वाटचाल करत राहणं हे मात्र खरं. पण चालत असताना खूप काही गोष्टी सोडाव्या लागतात तर नवीन फण्डे अवगत करावे लागतात. त्या परिस्थितीला सामोरे जातांना आयुष्यात येणाऱ्या माणसांचा फार मोलाचा वाटा असतो. बिकट परिस्थितीतून जातांना सहाय्य करणारी आणि खोचट बोलणारी, हसणारी, आणि मज्जा बघणारे ही सगळीच लक्षात राहतात अगदी शेवट पर्यंत.
काही दुःख / जख्मा इतक्या deep असतात, काळीज कापणाऱ्या त्याचा अंदाज लावू शकत नाही. दुःख छोटं मोठ हे प्रत्येकावर अवलंबून असत, त्याचा impact माणसा माणसापरी वेगवेगळा असतो. काही माणसं फारच हळवी, भावनाप्रधान, असतात तर काही निर्भीड, निडर तर सामर्थ्यवान असतात.
या quote मध्ये म्हटल्या प्रमाणे, Not all wounds are so obvious (सर्व जखमा इतक्या स्पष्ट नसतात), कोणत्या दुःखाचा / जखमेचा कोणावर काय प्रभाव पडतो, हे ओळखता येणं कठीण आहे. काळानुरुप त्या जख्मा बऱ्या होतात, किंवा विसरून ही जातात. पण काही जख्मा असतात त्या थोड्या धक्याने भळभळा वाहू लागतात, तर काही प्रसंग पुन्हा गतकाळात नेऊन सोडतात. ती व्यक्ती पुन्हा त्या चक्रव्युवात गोवली जाते, त्यातून बाहेर पडणं अवघड होऊन जात.
कोणाच्या बोलण्याचा आपल्यावर काही परिणाम होत नाही, असं वरवर आपण कितीही दाखवायचा प्रयत्न केला, तरी त्या गोष्टी मनात घर करून राहतात.काही अबोल वाटणाऱ्या व्यक्ती मनात वादळ घेऊन वावरत असतात त्याला हे ही एक कारण असावं. व्यक्तीपरी वागण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. मागचा पुढचा विचार न करता जेव्हा कळत नकळत आपण एखाद्यावर हसतो, जोक करतो, त्या व्यक्तीवर होणाऱ्या परिणामाची पर्वा न करता. असं बेपर्वा वागणं किती घातक ठरू शकत याचा विचार आपण करत नाही.