Kavita Mazhi

Wednesday, April 12, 2023

 तू 

श्वास तू आभास तू 
स्वप्न तू स्वप्नात तू 
कळी तू फुल तू 
मोगरा तू सुगंध तू 
ओढ तू भेट तू 
सांज तू भास्कर तू 
सागर तू किनारा तू 
चंद्र तू चांदणी तू 
वारा तू वादळ तू 
शब्द तू शब्दात तू 
कवी मनाची कल्पना तू 

 

जिंदगी

जिंदगी नाराज़ मत हो
हम मन के बहुत सच्चे थे 
चापलूसी मैं थोड़े कच्चे थे 
दर बदर की ठोकर खायी है 
तभी तो दुनियादारी, दिमाग मैं घुस पायी है  
सच्चे का मुँह काला, झुठे का बोल बाला है 
हम खुद ही खफा है खुदपर 
ना तो दुनियदारी समझ मैं आयी, ना तो खुदा की खुदाई,
"जिंदगी" तुम भी तो ख़फा हो हमसे 
किस किस की नाराज़गी, कब तक मुझे झेलनी है
बस.. .. 
मौत बाहोंमे आख़री साँस लेनी है  

 

निरागस

निरागस मनाला समजवू कसं 
अंतरिय भावनांना आवरू कसं 
डोळ्यांची भाषा आई वाचू शकते 
पिल्लाच्या वेदना ती समजू शकते 
सल आयुष्यात कायम आहे 
प्रेमाचा पाझर पित्याला नाही 
जीव स्वतःच्या लेकरावर एवढा सुद्धा नाही 
त्या, चिमुकल्या जीवाला समजवू कसं
दोनाश्रू ढाळून मी गप्प होते 
निरागस मनाला पटवू कसं 

 शोधू मला मी कशी


शोधू मला मी कशी, सांगेल का इथे कुणी?
काळाच्या सावल्या मध्ये   
लपली छबी अशी कशी 
आघात मनावर अनेक झाले 
जवळचे  माझे सारे
पडद्यामागे गडप झाले 

अविश्वासाचे भूत मनाच्या 
पारंब्यांवर जाऊन बसले 
फसवे मुखवटे इथे सारे 
रंग मनाचे उडवून बसले 

ठेचाळलेल्या या मनाला 
धर्याने मी पुन्हा जोडलें
जडण घडण करता करता 
मीच मला हरवून बसले  
शोधू मला मी कशी, सांगेल का इथे कुणी? Savita BK

 


नारी तू सतर्क हो 

व्यक्त हो सशक्त हो, नारी तू सतर्क हो 
दुर्गा तू काली तू 
प्रेमाचा साक्षात्कार तू 
अबला नाही सबला हो 
व्यक्त हो सशक्त हो, नारी तू सतर्क हो 
ज्वाला तू अंगार तू 
प्रतिकाराची स्फूर्ती तू 
नराधमांचा काळ हो 
व्यक्त हो सशक्त हो, नारी तू सतर्क हो 
कृष्णाची मीरा तू झाशीची राणी तू 
भक्तीचा सागर तू 
लढण्यास आता सज्ज हो 
व्यक्त हो सशक्त हो, नारी तू सतर्क हो 
चूल तू बंधन तू 
तोड सारे बांध आता 
ज्ञानाचा प्रकाश हो 
व्यक्त हो सशक्त हो, नारी तू सतर्क हो 

 देवा तू आला नाही


देवा तू आला तरी, भेटल्या सारखा वाटलं नाही
सगळ्यांच्या घरी आला पण, माझ्या घरी आला नाही

माझा छकुला बघत होता, रोज तुझी वाट
त्याला उत्तर देता देता, लागली माझी वाट

तुझ्या आगमनाची केली होती, जय्यत तयारी
बसायला सिंहासन अन, नेसायला पिवळा पितांबर भारी
 
तुला सुंदर दिसला असता, हिऱ्यांचा मुकुट
सोन्याची कंठी घातल्यावर, दिसला असता उठून

तुझ्या स्वागताला आणले होते, ढोल लेझीम ताशे
रोज रोज करणार होते, तुपातली मोदक सारे

तुझ्या आरतीमूळे, मन आलं असत भरून
तुझ्या आगमनाचा आनंद, दिसला असता डोळ्यांतून

सगळी तयारी केली देवा, काय चूक झाली
माझ्या घराची वाट तुला, का नाही गावली ?

खर खरं सांग देवा, काय आमचं चुकलं
माझं घर चुकवून, तू का प्रस्थान केलं ?

भक्तांचा कैवारी तू, चुकलं आमचं माफ कर
पुढच्या वर्षी तरी देवा, माझ्या घरी आगमन कर
पुढच्या वर्षी तरी देवा, माझ्या घरी आगमन कर